Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi

का नाही आलास?

जेव्हा शेतकऱ्यांनी तुला शोधताना आत्महत्येचे विचार केले तेव्हा का नाही आलास? बालकृष्णाचे हाण्डी फोडणारे गोविन्दा चढले पडले हात पाय तुटले तेव्हा का नाही आलास? गणपती बाप्पा येउन गेले सागरात प्लास्टरचे तुकडे झाले तेव्हा का नाही आलास? अाता तुझ्याविना जगणे शिकले पाउस हा शब्दच विसरले मित्रा अाता कशाला आलास? Published in Amaravati Poetic Prism 2016 ed. Padmaja Iyengar, Cultural Centre of Vijayawada & Amaravati