जेव्हा शेतकऱ्यांनी तुला शोधताना
आत्महत्येचे विचार केले
तेव्हा का नाही आलास?
आत्महत्येचे विचार केले
तेव्हा का नाही आलास?
बालकृष्णाचे हाण्डी फोडणारे
गोविन्दा चढले पडले हात पाय तुटले
तेव्हा का नाही आलास?
गोविन्दा चढले पडले हात पाय तुटले
तेव्हा का नाही आलास?
गणपती बाप्पा येउन गेले
सागरात प्लास्टरचे तुकडे झाले
तेव्हा का नाही आलास?
सागरात प्लास्टरचे तुकडे झाले
तेव्हा का नाही आलास?
अाता तुझ्याविना जगणे शिकले
पाउस हा शब्दच विसरले
मित्रा अाता कशाला आलास?पाउस हा शब्दच विसरले
Published in Amaravati Poetic Prism 2016
ed. Padmaja Iyengar,
Cultural Centre of Vijayawada & Amaravati
Comments